काय तो अंमळनेरचा रस्ता.
काय ते अधिकारी..
काय ते कॉन्ट्रॅक्टदार…सगळं कसं मिळून मिसळून चाललंय!
★तो अंमळनेरचा रस्ता मंजूर होऊन अनेक वर्षापासून जैसे थे!
★राज्य मार्ग ते बसस्थानक अंमळनेर रस्त्याची दुर्दशा ; अर्धवट कामामुळे जनता आंदोलनाच्या तयारीत
कुसळंब | प्रतिनिधी
पाटोदा तालुक्यातील अंमळनेर येथील पोकळे वस्ती ते बस स्टॅन्ड प्राथमिक आरोग्य केंद्र जुनी बाजारपेठ हा रस्ता कित्येक वर्षानुवर्षे उद्घाटनावरच अवलंबून होता कितीतरी पोते नारळ फोडले गेले पण या रस्त्याचं काम गेल्या सात वर्षे झाले तरी या कामाला मुहूर्त लागला नाही कसा बसा मुहूर्त लागला दिनांक 5 /3/ 2021 रोजी काम सुरू करण्याचे आदेश महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास मंडळांनी दिले मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून कामास मंजुरी भेटली मंजुरी भेटून बराच कालावधी होऊन गेला त्यानंतर यशराज कंट्रक्शन बीड या कंपनीला काम मिळाले या कंपनीने हे काम कासवाच्या गती पेक्षा पण कमी गतीने सुरू केले सध्या फक्त खडी टाकून त्याच्यावरती मुरूम व जास्त प्रमाणात मातीचे प्रमाण टाकल्याने व त्याच्यावर हलक्या हाताने थर टाकला आहे इथपर्यंत काम करून आहे तसे काम सोडून दिले खडी व माती टाकून तीन महिने होऊन गेले तरी त्याच्या पुढील काम कसलंच केल नाही त्यानंतर पावसाळा सुरू झाला आता त्या रस्त्याची अवस्था अशी झाली आहे की आगीतून पडण्यापेक्षा ही वाईट अवस्था झाले आहे. या रस्त्याने सध्या पाय चाललं तर कठीणच झालआहे व मोटरसायकल चालवताना कित्येक वेळा पडावं लागत आहे याची बेरीज राहिलेली नाही रोज सात आठ जण गाडीवरून पडत आहेत त्याच रस्त्यावरती अमळनेरचे प्राथमिक आरोग्य केंद्र देखील आहे पावसाळ्याच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दवाखान्यात जाण्यासाठी पेशंटला त्रास होत आहे सध्याच्या काळामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये साथीच्या रोगामुळे खूप मोठ्या प्रमाणावर पेशंट येतात त्या पेशंटला खूप मोठ्या प्रमाणात त्रास जाण्यासाठी होत आहे तरी याची दखल कोणी घेत नाही व अमळनेर येथील बस स्थानक हे देखील याच रस्त्यावरती आहे त्या ठिकाणी जाताना प्रवाशांना सुद्धा देखील मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे व त्रास सहन करावा लागत आहे या रस्त्याने धड चालता येत नाही ना गाडी चालता येत नाही त्यामुळे आगीतून फुफाट्यात पडल्यासारखी वेळ आलेली आहे आणि मुख्य म्हणजे या रस्त्यावरून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला जाणारा रस्ता मुख्य रस्ता हाच आहे त्यामुळे या रस्त्यावरून जाताना या शाळेतील चिमुकल्यांना इतक्या मोठ्या प्रमाणात दुर्गंधी होत आहे त्यांचे शाळेचे गणवेश सुद्धा रोज शिकल्याने खराब पाण्याने खराब होत आहेत त्यामुळे त्या चिमुकल्यांना देखील खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे त्याचबरोबर संपूर्ण गावाची मुख्य बाजारपेठ समजली जाणारी या रस्त्यावरच अवलंबून आहे याच रस्त्यावरून सर्व लोक बाजारात येत जात असतात हा रस्ता म्हणजे अमळनेरचा केंद्रबिंदू रस्ता आहे या रस्त्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र बस स्टॅन्ड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डीसीसी जिल्हा मध्यवर्ती बँक आणि अमळनेर मुख्य बाजारपेठ या रस्त्यावरून रहदारी सुरू असते आज त्याच रस्त्याची दैनि अवस्था पाहता एक माणूस सुद्धा जाऊ शकत नाही आणि येऊ शकत नाही या रस्त्यावरून इतक्या मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर चिखल झालेला आहे रस्त्यावर खडी वरती माती टाकल्याने या रस्त्यावर चिखल मोठ्या प्रमाणात झालेला आहे या रस्त्यावर रोज होणारा त्रास आणि या रस्त्याच्या काम करणाऱ्या ठेकेदाराला वैतागून अमळनेरकर आता रस्ता रोकोआंदोलन करणारआहेत येत्या काही दिवसांमध्ये या रस्त्याचा कायमस्वरूपी रस्त्याचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर दिसत आहे कारण या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर आंदोलनाची तयारी सुरू आहे आंदोलन असे होणार की भूतना भविष्य रस्ता रोको आंदोलन अमळनेर मध्ये येणाऱ्या क्रांतीदिनी करण्यात येणार आहे याकरिता शासनाने रस्त्याचे काम त्वरीत सुरू करून जनतेला आधार द्यावा व शासनाचा व कंपनीचा नावलौकिक होऊन महापुण्य मिळेल..अशा अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहेत…
★यशराज कंट्रक्शनला वारंवार नोटिसा
अंमळनेर येथील पोकळे वस्ती रस्ता मंजूर होऊन आतापर्यंत खडी व मुरूमाचे काम पूर्ण झाले आहे राहिलेल्या कामास यशराज कंट्रक्शन ला वारंवार नोटिसा देऊन झाल्या आहेत आत्ताच्या परिस्थितीमध्ये या रस्त्याची खूप मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषद काम आहे का मुख्यमंत्री बांधकाम विभागदयनीय अवस्था झालेली आहे, तरी मी कंपनीला वारंवार सांगितलेले आहे काम वेळेत पूर्ण करून घ्या म्हणून सध्या कामाची मुदत देखील संपून गेलेली आहे.
– इंजिनीयर जगदाळे
मुख्यमंत्री ग्राम सडक योजना बीड.
★अंमळनेरच्या त्या रस्त्याच्या देखभालीचे पाच वर्षे देखील पूर्ण होत आले!
एखादा रस्ता तयार करण्याचा कालावधी दिल्यानंतर तिथून पुढे पाच वर्षे त्या रस्त्याची जबाबदारी त्याच कॉन्ट्रॅक्ट दाराकडे असते परंतु अमळनेर मधील तो रस्ता तयार करण्याचा कालावधी संपून पुढील देखभालीचे पाच वर्षे संपत आले तरी रस्ता तयार नाही. अधिकारी नोटीसा देऊन थकले पण यशराज कंट्रक्शन मात्र अधिकाऱ्यांच्या नोटिशीला केराची टोपली दाखवत आपल्याच धुंदीमध्ये आहेत…
★आता जनताच रस्त्यावर उतरेल..
हा रस्ता जर लवकर नाही झाला आता जनताच आंदोलनाचा शस्त्र हातात घेऊन पुढील पाऊल उचलणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.. कॉन्ट्रॅक्टदार अधिकाऱ्याचा जर ऐकत नसेल तर मग कोणाचा ऐकणार अशा कॉन्टॅक्टदारांना टेंडर देतातच का ? असे प्रश्न जनतेमधून उपस्थित होत आहेत.. आता हा प्रश्न लवकर मार्गी निघाला नाही तर आंदोलन करण्यात येईल असा जनतेमधून शहरात देण्यात आला आहे…