★कारगिल दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सैनिक संघटनेकडून सन्मान!
जामखेड | प्रतिनिधी
पत्रकारिते’च्या माध्यमातून युवा पत्रकार धनराज पवार यांचे कार्य अल्पावधीत उल्लेखनीय असून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून समाजात वेगळेपणाने कार्य करणारे पत्रकार धनराज पवार हे गेल्या 2 वर्षांपासून विविध प्रश्नांवर काम करत असून गोरगरिबांचे प्रश्न प्रशासनाच्या लक्षात आणून देत आहेत, आजतागायत शहरातील अनेक प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून सोडवले आहेत.तीन वर्षांपूर्वी कोरोना काळात पत्रकारितेच्या माध्यमातून स्वतः रस्त्यावर उतरून अधिक रुग्णांचे प्रश्न व त्यांना सेवा मिळावी यासाठी सतत बातमीतून प्रश्न मांडले, अशा विविध प्रश्नांवर काम करणाऱ्या पत्रकार धनराज पवार यांच्या कार्याची दखल घेत दिनांक २६ जुलै कारगिल विजय दिवस निमित्त जामखेड तालुका माजी सैनिक संघटनेच्या वतीने तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पत्रकारितेपुढे असलेल्या विविध आव्हानांचा मुकाबला करून शुद्ध व निखळ पत्रकारिता करण्याचे आवाहन
तहसीलदार योगेश चंद्रे यांनी केले. यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे, पोलीस निरीक्षक महेश पाटील, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, नगर परिषदे चे मुख्याधिकारी अजय साळवे, पारनेर सैनिक बँक चे संचालक दत्तात्रय सोले पाटील, माजी सैनिक संघटना संस्थापक बजरंग डोके ,अध्यक्ष दिनकर मोरे उपाध्यक्ष नानासाहेब बाबर, सचिव अंकुश जगदाळे ,खजिनदार शिवाजी साळुंखे, क्रांतिवीर अकॅडमी चे संचालक रावसाहेब जाधव ,उद्योजक किसन चिलगर मेजर ,लाव्हाळे मेजर, सिंगते मेजर, गर्जे मेजर, संतोष कदम मेजर,नागरगोजे मेजर, आशाताई आंधळे ,योगेश सुरवसे,भूमीलेखचे डोळस साहेब, नागेश विद्यालय स्कूल कमिटीचे सदस्य उद्योजक विनायक राऊत, प्राचार्य डोंगरे एम एल ,प्राचार्य श्रीकांत होशिंग ,प्राचार्य मडके बि के, कन्या विद्यालय पर्यवेक्षक संजय हजारे, सर्कल-नंदकुमार गव्हाणे , एनसीसी ऑफिसर कॅप्टन गौतम केळकर सेकंड ऑफिसर अनिल देडे, थर्ड ऑफिसर मयूर भोसले , शिवप्रतिष्ठान अध्यक्ष पांडुरंग भोसले, पोलीस नाईक अविनाश ढेरे, मंडल अधिकारी रविंद्र जोशी, देसुरकर मेजर, अनिल जावळे, ॲडव्होकेट प्रमोद राऊत, नागरगोजे, आजी-माजी सैनिक तसेच ग्रामस्थ व एनसीसी कॅडेट मोठ्या संख्येने उपस्थित होते.