8 C
New York
Thursday, April 3, 2025

Buy now

spot_img
spot_img

मराठा सोयरीकची चळवळ आता तेलंगणा राज्यातही!

मुख्यमंत्री ‘केसीआर’ यांचे मेळाव्यासाठी आश्वासन !

मुंबई : वृत्तांत

तेलंगणा सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले. असा प्रयोग महाराष्ट्रात का होत नाही? असा प्रश्न उपस्थित करून राज्यातील नेत्यांनी तेलंगणा सरकारचा आदर्श घ्यावा असे अवाहन मराठा सोयरीक चे सुनील जवंजाळ पाटील यांनी केले आहे. नुकतीच त्यांनी हैदराबाद येथे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी तेलंगणामध्ये मराठा मेळावा घेण्यासाठी अनुकूल प्रतिसाद दर्शविला आहे.

तेलंगणा सरकार यांनी तिथे शेतकरी हिताची खूप कामे केली आहेत. 2014 साली हे राज्य अलग झाले. अवघ्या दोन पंचवार्षिक मध्ये तिथे आमुलाग्र बदल मुख्यमंत्री के सी आर यांनी घडवून आणला आहे. हा विकास पाहण्यासाठी जिल्ह्यातील पत्रकार व शेतकरी यांना तेलंगणा सरकारने निमंत्रित केले होते. त्यात मराठा सोयरीकचे सुनील जवंजाळ पाटील सहभागी झाले. दिनांक २४ जुलै रोजी मुख्यमंत्री

निवासस्थानी भेट झाली. मुख्यमंत्री यांनी सर्वांशी संवाद साधला. सहज व साधेपणाने त्यांनी सर्वांची विचारपूस केली. यावेळी पाटील यांनी देशात सुरू असलेल्या मराठा सोयरीक लोक चळवळीची व सामाजिक कार्याची माहिती दिली. तेलंगणा व आंध्र प्रदेशामध्ये जवळपास 20 ते 22 लाख मराठा कुटुंब वास्तव्यास आहेत. या ठिकाणी मराठा मेळावा घेण्याविषयी मुख्यमंत्री के सी आर व सुनील जवंजाळ यांनी वीस मिनिटे चर्चा केली. या बाबत मुख्यमंत्री यांनी सकारात्मकता दर्शवली आहे.लवकरच तिथे समाज मेळावा घेतला जाणार आहे,. मुख्यमंत्र्याच्या आश्वासनामुळे मराठा चळवळ आता तेलंगणातही पोहोचली आहे. अशा कल्पक आणि सर्वसमावेशक मुख्यमंत्र्यांमुळे तेलंगणा राज्याशी मराठा समाज सहज सोयरीकीच्या माध्यमातून जुळला जाऊ शकतो. त्याद्वारे केवळ महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात सोयरीक करताना जी मुलींची संख्या मुलांच्या तुलनेत कमी आहेसं जाणवत होतं ती उणीव भरून निघण्याला संधी आहे. महाराष्ट्रातील बहुगुणी आणि बहुआयामी लेकरांसाठी त्यांच्या वैवाहिक भवितव्यासाठी अजून एक सबळ आणि सक्षम व्यासपीठ उपलब्ध झालेलं आहे. असं नातं आपल्याला प्रत्येक राज्याशी जोडता आलं तर ही चळवळ भारतभर किंबहुना त्याहीपेक्षा विस्तीर्ण म्हणजे देशाबाहेर ही जाऊ शकते आणि ते आपल्या मूलगामी प्रयत्नांचं एक खूप मोठं अलौकिक यश असेल आणि अर्थातच त्याचा फायदा माझ्या महाराष्ट्रातील लेकरांना होईल..

★राज्यातील नेत्यांनी तेलंगणाचा आदर्श घ्यावा

तेलंगणातील शेतकरी आत्महत्या थांबवण्यात तेथील सरकारला यश आले. त्यांनी शेतीमध्ये केलेले विविध प्रयोग, तरुणांना दिलेली रोजगारांची माध्यमे इथे का शक्य होत नाही ? महाराष्ट्रातील नेत्यांनी तेलंगणा राज्याचा दौरा करून तेथील नेत्यांचा आदर्श घेण्याची गरज आहे. असे सुनील जवंजाळ यांनी म्हटले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!