12.2 C
New York
Saturday, April 5, 2025

Buy now

spot_img
spot_img

चुंबळीच्या ग्रामसेवकानी जनतेची लावली वाट!

★महसूल विभागाने निगराणीसाठी दिलेली गायरान जमीनीचा संबंधित अधिकाऱ्याकडून सावळा गोंधळ

★हजारो रुपये घेऊन पीटीआर दिलेच निदर्शनास ; बोगसगिरीची हद्दच केली

पाटोदा | प्रतिनिधी

तालुक्यातील मौजे चुंबळी ग्रामपंचायतीच्या अंतर्गत महसूल विभागाने निगराणीसाठी दिलेली गायरान जमीनाचा ग्रामसेवक श्री.बचुटे यांनी गावातील काही नागरिकांकडून हजारो रुपये घेऊन गुंठेवारी पि.टी.आर.सह देऊन आजब कारभार केल्याचे उघडकीस आले आहे.
हि जागा गावकऱ्यांनी गावाच्या सार्वजनिक सप्ताहा, सामाजिक कार्यक्रमासाठी उपयोग करीत होते. कुणालाही या जागेवर अतिक्रमण करुन दिले नव्हते.मात्र चुंबळीच्या ग्रामसेवक बचुटे यांनी. वरील जागेची वाट लावली आहे.हे प्रकरण उघडकीस आल्याने गावांमध्ये आपसात वाद निर्माण झालेले दिसत आहे. या ग्रामसेवक बचुटे चुंबळी या ठिकाणी कार्यरत झाल्यापासून गावातील घरपट्टी, पाणीपट्टी, नळपट्टी, लाईटपट्टी, वसुली करत नाही,गावांमध्ये दरवर्षी ५० च्या वर बांधकाम परवाना मिळत नसल्याने विनापरवाना बांधकाम मनाला येईल त्या पध्दतीने केले जातात.या ग्रामपंचायत मध्ये मासिक सभा, ग्रामसभा, ग्रामसेवक बचुटे आल्यापासून एकदाही झाली नाही. ग्रामपंचायतीला १४ व १५ व्या वित्त आयोगाच्या आरखड्याप्रमाणे कामे केली नाहीत. तसेच कोणताही हिशोब दिलेला नसल्याचे निवेदन यामध्ये या निवेदनामध्ये नमूद केले आहे.या ग्रामपंचायतीमध्ये शासनाने दिलेले कॅम्प्युटर व इतर साहित्य गायब झालेले असल्याने आॕपरेटर गायब असल्याने पाटोदा येथे येऊन रहिवासी, विवाह, मुत्यूप्रमाणपत्र, जन्मप्रमाणपत्र,असे कागद पत्र मागितल्यास आॕपरेटर अफाट पैसे घेतल्याशिवाय देत नाही.यामुळे गावकऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांना ग्रामसेवक बचुटे यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणीचे उपविभागीय अधिकारी पाटोदा गटविकास अधिकारी, यांना निवेदन देऊन माहितीपत्रके मुख्यकार्यकारी अधिकारी,केली केली आहे.या निवेदनावर भागवत नागरगोजे, शेषेराव केदार, अशोक गोंदकर, त्रिंबक पवळ, नारायण नागरगोजे, प्रवीण नागरगोजे, चेतन नागरगोजे, अजित नागरगोजे, मधुकर गोंदकर, महादेव नागरगोजे, केरू नागरगोजे, रामदास नागरगोजे,दसूहार सिरसट, भिमराव, सदाशिव पवळ, प्रभाकर नागरगोजे, विशाल पवळ, महादेव पवळ,कल्याण पवळ,राधाकिशन नागरगोजे,दत्तू केदार, राजेंद्र केदार, तुकाराम खंडागळे,बाबू नागरगोजे, दत्तू नागरगोजे , गोकुळ पव्हणे, हनुमान केदार ,भाऊसाहेब पवळ, अंगद निंबाळकर,लहू नागरगोजे, सोपान केदार, संदीप गोंदकर, सुभाष नागरगोजे, गर्जे सतीश, ज्ञानेश्वर कोळेकर, भागवत सानप, मोहन पवळ,पोपट पव्हणे,विष्णू कदम, संदीप सिरसाठ, घनशाम मस्के, राजेंद्र डिडूळ,मोहन पवळ,भागवत सानप,
सुनील गोंदकर, कैलास पवळ ,नामदेव चव्हाण, तुकाराम पवळ, मारुती पवळ, मारुती क्षिरसागर,विठ्ठल पवळ, छगन नागरगोजे, विठ्ठल पव्हणे, दादा पव्हणे, विठ्ठल मळेकर, लक्ष्मण पवळ, हनुमंत पवळ,बाळू बाप्पू पवळ, अशोक मळेकर,शहादेव गोंदकर,अनिल गोंदकर रामराव गोंदकर, उद्धव पवळ, महेबूब पठाण,बाळू पवळ, भाऊसाहेब गोंदकर, सिताराम नागरगोजे, प्रल्हाद नागरगोजे, शहादेव पवळ, अशोक झेड, शिरसाट आत्माराम, गोंदकर ,प्रभाकर तुकाराम गोंदकर, संजय शिरसाठ, बबन सानप, चंद्रकांत पवळ, क्षीरसागर अन्सार सय्यद, दत्तू निवृत्ती पवळ, गणेश पवळ,अशोक पवळ, जालिंदर सुनील पवळ, आजिनाथ नागरगोजे, नामदेव ढोले, पवळ भरत ,अनिल पवळ, दादा पव्हणे, भीमराव पवळ, आधीचे सह्या आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!