12.9 C
New York
Wednesday, April 2, 2025

Buy now

spot_img
spot_img

आपल्या हक्काच्या कृषिमंत्र्याकडे शेतकऱ्यांसाठी आमदार आजबेंचे विविध पत्र!

★आष्टी मतदारसंघातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचं मिळून देण्यासाठी आमदार आजबे यांची धडपड!

★पोखरा योजना हक्काच्या शेतकऱ्यांसाठी दुर्मिळच!

★शेतकऱ्यांच्या हितासाठी आष्टी मतदारसंघातील सर्व गावांचा पोखरा योजनेत समावेश करावा कृषीमंत्र्याकडे मागणी

आष्टी | सचिन पवार

सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. भाजप शिवसेना राष्ट्रवादीचे सरकार राज्यामध्ये नव्याने उदयाला आल्यानंतर पहिलेच अधिवेशन मुंबई येथे होत असल्याने प्रत्येक आमदार आपापल्या पद्धतीने मंत्र्याकडे मागणी करत आहेत. आष्टी मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी आपल्या बीड जिल्ह्यातील कृषीमंत्री असल्याने शेतकऱ्यांच्या हक्काचे प्रश्न सोडवण्यासाठी विविध मागणीचे पत्र देऊन चर्चा देखील केली आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे शेतकऱ्यांसाठी हक्काचं मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असून विविध पत्राद्वारे मागणी सुद्धा केली आहे.
बीड जिल्ह्याला प्रथमच कृषिमंत्री मिळाल्याने शेतकऱ्यांना विविध योजनेतून कसा फायदा मिळून देता येईल यासाठी आष्टी मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे विविध योजनेतून शेतकऱ्यांना फायदा मिळवून देण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे.. खास करून आष्टी मतदारसंघातील सर्व गावाचा पोखरा योजनेत समावेश करून शेतकऱ्यांना फायदा मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत… प्रत्येक अधिवेशनामध्ये आ.बाळासाहेब आजबे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक होतात तर कधी मंत्र्यांच्या दारोदारी जाऊन शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचं मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत..

★सर्व गावांचा पोखरा योजनेत समावेश

आष्टी मतदारसंघातील अनेक शेतकरी बऱ्याच योजनेपासून वंचित राहिले आहेत. सर्व शेतकऱ्यांना आता त्यांच्या हक्काचे मिळवून देण्यासाठी आपल्या हक्काचा कृषिमंत्री मिळाला आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून आष्टी मतदारसंघातील सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी आमदार बाळासाहेब आजबे प्रयत्न करत आहेत.. विशेष करून सर्व गावांचा पोखरा योजनेत समावेश करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू देखील आहेत..

★शेतकऱ्यांना त्यांचा हक्कच मिळून घ्यायच आहे – आमदार बाळासाहेब आजबे

शेतकऱ्यांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही. आता आपल्या हक्काचे कृषिमंत्री धनंजय मुंडे आपल्याला मिळाल्याने आपल्या शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सोडवून घेण्यासाठी मी विशेष प्रयत्न करत आहे. येणाऱ्या काळात पोखरा योजनेत सर्व गावांचा समावेश करण्यासाठी प्रयत्न करणार त्यासाठी कृषी मंत्र्यांची भेट घेऊन सुद्धा मागणी केली आहे. त्याचबरोबर कृषी संदर्भात सर्व योजनेचा फायदा आष्टी मतदारसंघातील शेतकऱ्यांना कसा होईल यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू आहेत..
– आ.बाळासाहेब आजबे
आमदार आष्टी विधानसभा मतदारसंघ.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!