★मराठवाड्यात उत्कृष्ठ काम केल्याबद्दल पत्रकार भारतकुमार पानसंबळ यांचा कॅटबरी कंपनीकडून 2023 चा पुरस्काराने सन्मानित!
शिरूर कासार | प्रतिनिधी
मराठवाड्यात उत्कृष्ठ काम केल्याबद्दल पत्रकार भारतकुमार पानसंबळ यांना कॅटबरी कंपनीकडून 2023 चा पुरस्काराने छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे मान्यवरांच्या उपस्थितीत मंगळवार (दि.२५) रोजी सन्मानित केले.. यावेळी कॅटबरी कंपनीचे बी.एस.एम.अधिकारी सुमित सर, ए.एस.एम. अनिल गायकवाड, एस.ओ.दुर्गेश जोशी, टी.एस.आय.जुनेद कादरी, टी.एस.आय. बालाजी इंगळे, एस.एस.चेतन मुनोत यांच्या उपस्थित पार पडला यावेळी पुरस्कार मिळाल्यानंतर तालुक्यातील सामाजिक, राजकीय, उद्योजक, व्यापारी, अधिकारी व तालुक्यातील पत्रकार बांधवानी अभिनंदन केले आहे. यावेळी या ठिकाणी मराठवाड्यातून लोकांची उपस्थिती होती.