11.2 C
New York
Tuesday, April 1, 2025

Buy now

spot_img
spot_img

तुळजाभवानी मातेच्या‎ अलंकाराची पुन्हा मोजणी‎

★एक नंबरच्या डब्यात आढळले 26 प्राचीन अलंकार‎

★प्राचीन व मौल्यवान ‎अलंकाराचा छडा लावण्यासाठी‎ पुन्हा अलंकारांची मोजणी

तुळजापूर‎ | प्रतिनिधी

तुळजाभवानी मातेच्या गहाळ‎ झालेल्या प्राचीन व मौल्यवान ‎अलंकाराचा छडा लावण्यासाठी‎ पुन्हा अलंकारांची मोजणी बुधवारी (दि.26) नव्याने सुरू करण्यात‎ आली आहे. बुधवारी एक नंबरच्या ‎ ‎ डब्यातील अलंकाराची मोजणी ‎करण्यात आली. यात 1 नंबर डब्यात‎ 26 प्राचीन मौल्यवान अलंकार आढळले. यात दोन अलंकार 1994 ‎नंतरचे आहेत. या वेळी 1975 च्या ‎फोटो अल्बमची मदत घेण्यात‎ आली.‎ दर्शन मंडपातील मोजणी कक्षात सकाळी 11 वाजता प्रत्यक्ष‎ मोजणीला प्रारंभ करण्यात आला.‎ सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत‎ दुपारी 3 च्या सुमारास 1 नंबर‎ डब्यातील अलंकाराची मोजणी‎ संपली. यानंतर मोजणीचा अहवाल‎ सादर करण्यात आला. दररोज‎ मोजणी अहवाल सादर करण्याचे‎ समितीला बंधनकारक करण्यात‎ आले आहे. दरम्यान, या वेळी‎ मोजणीसाठी 1975 – 76 च्या‎ अलंकाराचा फोटो अल्बमची मदत‎ घेण्यात आली.1963 च्या‎ रजिस्टरमधील नोंद, 2012, 2018 च्या रजिस्टरमधील नोंद व‎ सद्य:स्थितीत असलेले अलंकार‎ याप्रमाणे अलंकाराचे वर्गीकरण‎ करण्यात येत आहे. या वेळी‎ उमरग्याचे उपविभागीय अधिकारी‎ गणेश पवार, नायब तहसीलदार‎ अमित भारती आदींची उपस्थिती‎ होती.‎

★अलंकारांचे एकूण 7 डबे,‎ 7 दिवस मोजणी चालणार

तुळजाभवानी मातेच्या प्राचीन व‎ मौल्यवान अलंकाराचे एकूण 7 डबे‎ आहेत. यामध्ये शिवकालीन‎ अलंकाराचा समावेश आहे.‎ दीपावली पाडवा, दसरा, गुढीपाडवा,‎ रथसप्तमी, अक्षय तृतीया आदी‎ सन-उत्सवाला तुळजाभवानी‎ मातेची विशेष अलंकार पूजा मांडली‎ जाते. या वेळी हे अलंकार मातेला‎ घातले जातात. अलंकारांचे 7 डबे‎ असून डब्याची मोजणी 7 दिवस‎ चालणार आहे.‎

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!