★कारगिल दिनानिमित्त त्रिदल संघटनेच्या भव्य दिव्य कार्यक्रमाने सर्वांचीच लक्ष केले आकर्षित!
★पाटोद्यात शंभर गाड्यांची तिरंगा रॅली सैनिक वीरनारींचा सन्मान विविध कार्यक्रमाची रेलचेल !
पाटोदा | प्रतिनिधी
24 व्या कारगिल दिनानिमित्त पाटोदा येथे त्रिदल सैनिक संघटनेच्या आयोजित कार्यक्रमाने सर्वांचीच लक्ष वेधले होते. त्रिदल संघटनेकडून भव्य दिव्य पाटोदा येथे भव्य दिव्य 100 तिरंगा गाड्यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीन सर्वच पाटोद्याकारांचं लक्षवेधीत केले त्यानंतर चाऊस मंगल कार्यालयामध्ये वीर नारी सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी आजी-माजी सैनिक संघटना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्रिदरसनिक संघटनेच्या भव्य दिव्य कारगिल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अनेक वक्त्यांनी मनोगत व्यक्त करत सैनिकांच्या प्रश्नासाठी आवाज उठवण्यासाठी त्रिदल सैनिक संघटना आक्रमक करत आहे त्यांच्या पाठीशी आपण सर्वांनीच खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे अशा देखील भावना व्यक्त केल्या त्यावेळी पदाधिकारी ने देखील आपले मनोगत व्यक्त करताना संघटनेचे कार्य अधिक जोमाने भविष्यात केले जाईल त्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. अशा देखील भावना व्यक्त केल्या. यावेळी सामाजिक राजकीय धार्मिक शैक्षणिक पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. आलेल्या सर्व मान्यवरांचे त्रिदल सैनिक संघटने करून जाहीर आभार व्यक्त करण्यात आले.
★पाटोदा शहरात त्रिदल सैनिक संघटनेने सर्वांचेच लक्ष वेधले!
पाटोदा तालुक्यामध्ये कारगिलदिनानिमित्त त्रिदल सैनिक संघटने कडून भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये 100 गाड्यांच्या तिरंगा रॅलीने सर्वांचेच लक्ष आकर्षित केले येणाऱ्या काळात त्रिदल सैनिक संघटना अधिक क्रियाशील होऊन सैनिकांच्या प्रश्नावर आक्रमक पवित्र घेईल सैनिकांना न्याय मिळवून देईल त्यासाठीच काम केले जाईल असे सैनिक संघटनेकडून सांगितले आहे.
★अवघ्या दहा दिवसात भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन – मेजर शिवाजी पवार
कारगिल दिनानिमित्त भव्य दिव्य कार्यक्रमाचे नियोजन अवघ्या दहा दिवसांमध्ये करण्यात आले होते सर्वात आधी माजी सैनिक संघटनेने तुम्हाला कार्य केल्याने हा भव्य दिव्य कार्यक्रम संपन्न झाला भविष्यात सर्वांच्या नियोजनातून उत्कृष्ट कार्यक्रम समाज उपयोगी घेण्याचं त्रिदल सैनिक संघटनेचा नियोजन असेल त्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रित काम करू आणि सर्वांनाच न्याय मिळवून देण्याचे काम करू…
– मेजर शिवाजी पवार
अध्यक्ष मराठवाडा तथा पाटोदा तालुका.
★क्रांतिकारकांचा पाटोदा तालुका
पाटोदा तालुका हा क्रांतिकारकांचा आणि क्रांती घडवणाऱ्यांचा आहे. येणाऱ्या काळात तरी जर संघटनेच्या माध्यमातून अशी क्रांती घडवली जाईल की ती सर्वांनाच कायमची लक्षात राहील असे देखील कार्यक्रम उपक्रम संघर्षशील कार्य त्रिदल संघटनेकडून केले जातील असं देखील पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. याच क्रांतीकारकांच्या भूमीत नवीन क्रांती त्रिदल सैनिक संघटनेकडून घडवली जाईल देखील भावना व्यक्त केल्या आहेत..
★बीड जिल्ह्याच्या आजी-माजी सैनिकांच्या अडचणी दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू – मेजर संदीप लगड
महाराष्ट्र राज्यातील त्रिदल संघटनेच्या माध्यमातून आजी-माजी सैनिकांचे प्रश्न सोडवण्याचं काम सुरू आहे. विशेष करून बीड जिल्ह्यातील आजी-माजी सैनिकांचे प्रश्न अडीअडचणी सैनिकांचे स्मारक त्यांच्या कुटुंबावर येणार संकट हे दूर करण्याचे काम त्रिदल सैनिक संघटनेच्या माध्यमातून केले जात आहे यापुढे देखील करत राहू..
– मेजर संदीप लगड
अध्यक्ष त्रिदल संघटना महाराष्ट्र राज्य.