12.2 C
New York
Saturday, April 5, 2025

Buy now

spot_img
spot_img

मुलगी पहायला गेले अन् लग्न लाऊन आले

★पाटोद्याच्या चाऊस व माजलगावचे अलसारी परिवारातील लग्न ठरला आदर्श!

पाटोदा | प्रतिनिधी

आजच्या काळात लग्नसमारंभ मोठ्या थाटात करण्याची पद्धत रूढ झाली आहे. पण चाऊस आणि अलसारी परिवारातील सदस्य तथा नवदाम्पत्याने बडेजावपणा व अनावश्‍यक खर्चाला फाटा देत “चट मंगनी पट ब्याह’ करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केले आहे. पाटोदा येथील हसनभाई बिनकुर्दुस(चाऊस) यांचे सुपुत्र मंहमद चाऊस हे उच्चशिक्षित असून, त्यांचा स्वत:चा हॉटेल व्यवसाय आहे. यांच्यासाठी मुलगी पाहायला अलसारी परिवाराच्या निमंत्रणावरून गुरूवार (दि.२७) माजलगाव गेले होते. सलिम अलसारी यांची मुलगी ही सुद्धा उच्च शिक्षीत असून,दोघांनीही एकमेकांना पसंत केले. दोन्ही परिवाराचीही पसंती झाली आणि त्यातूनच अवाजवी खर्च आणि वेळ वाया घालविण्यापेक्षा लागलीच लग्न लावून देण्यास काय हरकत आहे ? असा प्रस्ताव महाराष्ट्र केसरी सईद चाऊस व माजी नगराध्यक्ष सहाल चाऊस यांनी समोर आणल्याने दोन्ही परिवारांनी त्यांना होकार दिला आणि अवघ्या दोन तासांतच कौटुंबिक वातावरणात मोजक्‍या समाजबांधवांच्या व आप्तेष्टांच्या उपस्थितीत मुस्लिम धर्म पद्धतीने विवाहबद्ध झाले.यावेळी प्रमुख उपस्थिती मा.नगराध्यक्ष सहाल चाऊस,महाराष्ट्र केसरी सईद चाऊस यांची होती यावेळी बोलतांना सहाल चाऊस म्हणाले की दोन्ही परिवारांनी वेळ, श्रम व पैशांची बचत करून समस्त मुस्लिम समाजात एक नवीन आदर्श निर्माण केला असल्याने. समाजाला आता अशा प्रकारच्या विवाहांची गरज असून,चाऊस-अलसारी परिवाराचे अभिनंदन व कौतुक केले.या आदर्श विवाहासाठी प्रतिष्ठित व्यापारी कैफ मकराणी, ताहेर चाऊस, तौसिफ (जनता)मंहमद चाऊस यांचा मित्रपरिवार आदी उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!