4.8 C
New York
Wednesday, April 2, 2025

Buy now

spot_img
spot_img

शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक!

★केंद्राच्या सत्तेला हादरा देणारा शरद पवारांचा तिसरा प्लॅन तयार!

★शरद पवार यांचा तिसरा प्लॅन BJP साठी घातक !

 

★NCP तील बंडखोरीनंतर पवारांची मोठी खेळी ; राजकारण तापणार!

★शरद पवारांची तिसरी खेळी सत्ताधारी भाजपसाठी नुकसानकारक ठरण्याची शक्यता

मुंबई : वृत्तांत

राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीनंतर शरद पवार पुन्हा एकदा पक्षबांधणीसाठी मैदानात उतरलेत. त्यांनी पक्षाचे बंडखोर नेते व भाजपला अस्मान दाखवण्याची मोठी तयारी केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांनी यासंबंधी 3 प्लॅन तयार केले असून, त्याचा सर्वात मोठा फटका केंद्रातील सत्ताधारी भाजपला बसण्याची शक्यता आहे.
अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा गट शिंदे – फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाला. त्यात अजित पवार स्वतः उपमुख्यमंत्री झाले, तर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आदी बडे नेते कॅबिनेट मंत्री झाले. या घटनाक्रमामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकले झाली. त्यानंतर अजित पवारांच्या गटाने शरद पवारांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला. पण पवारांनी त्यांच्यासोबत येण्यास ठाम नकार दिला. आता पवार पुन्हा एकदा नव्या जोमाने पक्ष संघटना बांधणीसाठी मैदानात उतरलेत. त्यांनी यासंबंधी 3 प्लॅन तयार केलेत.

★पक्ष संघटनेच्या बांधणीवर जोर

राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकले झाल्यानंतर शरद पवार यांनी पक्षाला उभे करण्यासाठी 3 प्लॅन तयार केलेत. यातील पहिल्या प्लॅननुसार, शरद पवार पक्ष बांधणीवर जोर देणार आहेत. त्यानुसार राज्यातील सर्वच महत्त्वाचे जिल्हे व तालुक्यांत त्यांच्या सभा होतील. या भागातील जनतेशी शरद पवार संवाद साधून त्यांना आपल्या गाठीशी बांधण्याचा प्रयत्न करतील.राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या भागावर त्याचा विशेष लक्ष असेल. नेते गेले तरी कार्यकर्ते व जनता आपल्याबरोर राहील याची खास काळजी शरद पवार घेणार अस्लयाची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Business having a finger under his chin and thinking

★पर्यायी नेतृत्व तयार करणार

शरद पवार आपल्या दुसऱ्या प्लॅन अंतर्गत पर्यायी नेतृत्व निर्माण करण्यावर भर देणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या आमदारांनी पक्षाशी बंडखोरी केली, त्यांच्या मतदार संघात ते पर्यायी नेतृत्व उभे करतील. यात पक्षाच्या माजी आमदारांना पुन्हा ताकद दिली जाईल. त्यांना रसद पुरवली जाईल. हे माजी आमदार निवडणुकीत उतरतील, याच हिशेबाने त्यांना तयार केले जाईल, असे सूत्रांनी सांगितले आहे.

★भाजपला खिंडार पाडण्याचा प्रयत्न

शरद पवारांची तिसरी खेळी सत्ताधारी भाजपसाठी नुकसानकारक ठरण्याची शक्यता या आहे. या तिसऱ्या प्लॅननुसार, शरद पवार भाजपच्या अडगळीत पडलेल्या माजी आमदारांना आपल्या गोटात वळवण्याचा प्रयत्न करतील. या आमदारांना राष्ट्रवादीत घेऊन त्यांना रसद पुरवली जाईल.सूत्रांच्या माहितीनुसार, या आमदारांची राजकारणात पुन्हा सक्रीय होण्याची इच्छा आहे. पण भाजपने त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. यामुळे त्यांचा नाईलाज झाला आहे. त्यामुळे पवारांचा त्यांच्यावर डोळा आहे. यात त्यांना यश आले तर ते भाजपसाठी चांगलेच जड जाईल.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!