12.9 C
New York
Tuesday, April 1, 2025

Buy now

spot_img
spot_img

रेशीम’मुळे शेतकरी वाघमारेंच्या जीवनात झळाळी!

★तीनशे एकरात रेशीम, एकरी २ लाख ५० हजारांचा नफा

संभाजीनगर | प्रतिनिधी

पैठण तालुक्यातील केकत जळगावच्या दांपत्याला मिळाले अाठ पुरस्कार‎ सध्या मराठवाडा हे रेशीम लागवडीचे प्रमुख केंद्र बनत असून येथील क्षेत्र वाढत आहे. पैठण तालुक्यातील केकत जळगाव येथील एका शेतकरी दांपत्याने जवळपास ३०० एकरांत रेशीम लागवडीचा प्रयोग केला आहे. या रेशीम शेतीतून त्यांना दरवर्षी सुमारे एक एकरवर २ लाख ५० हजारांचा नफा मिळत असून या शेतकरी दांपत्याच्या जीवनात रेशीममुळे झळाळी आली आहे.
काहीतरी वेगळे करण्याच्या आणि शेती पद्धतीत बदल करण्याच्या प्रयत्नातून शेतकरी संतोष सखाराम वाघमारे यांनी नवा मार्ग शोधला आणि त्यांनी तो मेहनतीच्या जोरावर यशस्वी करून दाखवला. संतोष वाघमारे व त्यांच्या पत्नी मंगलबाई वाघमारे यांचे रेशीम शेतीमधील योगदान लक्षात घेऊन २०१४ साली मंगलबाई वाघमारे यांना तत्कालीन केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री संतोषकुमार गंगवार यांच्या हस्ते ‘रेशीम शेती उत्कृष्ट महिला’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने कृषी व पणन विभाग यांच्याकडून २९ ऑगष्ट २०१४ साली संतोष वाघमारे यांनाही तालुका कृषी विभागाकडून पुरस्कार देण्यात आला. केंद्र सरकारकडून केंद्रीय रेशीम मंडळ केंद्रीय रेशीम उत्पादन संशोधन तथा प्रशिक्षण संस्था मन्सूर यांच्या वतीने रेशीम शेतीमध्ये २०१५ ते १६ यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ‘रेशीम कृषक मेळावा २०१६’ हे प्रमाणपत्र पुरस्कृत करण्यात आले. २०१४ मध्ये महाराष्ट्रातील शेती क्षेत्रात अभिनव उपक्रम राबवून प्रेरणादायी योगदान दिल्याबद्दल कृषीथॉन या संस्थेकडून गौरव करण्यात आला. १५ मार्च २०१५ रोजी ग्रामराज्य शेतकरी पुरस्कार वाघमारे कुटुंबास देण्यात आला.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!