जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक स्वबळावर लढवणार – प्रदेश संघटक कैलास जोगदंड
आष्टी | प्रतिनिधी

रिपब्लिकन पार्टी हा बाबासाहेबांच्या विचारांचा पक्ष आह. त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.दिपक भाऊ निकाळजे आहेत. रिपब्लिकन पक्षाला आता खंबीर नेतृत्व भेटलेला आहे या खंबीर नेतृत्वाचे हात बळकट करण्यासाठी आपण जिल्ह्यात व तालुक्यात समाजाला न्याय देण्यासाठी आपण रस्त्यावरून समाजाचे काम केले पाहिजेत आष्टी तालुक्यात व बीड जिल्ह्यात पक्ष बांधणी मजबूत करून येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आपण स्वबळावर लढवणार असल्याचे मत प्रदेश संघटक कैलास जोगदंड यांनी व्यक्त केले ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( ए ) कमिटी यांच्यावतीने रिपब्लिकन पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त व दिपक भाऊ निकाळजे यांच्या वाढदिवसानिमित्त आष्टी येथे शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीत बोलत होते.हि बैठक पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक कैलास जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली व बीड जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन केले होते पक्षाबद्दल बोलताना कैलास भाऊ जोगदंड यांनी मार्गदर्शन केले त्या मार्गाने तालुक्यातील पक्ष वाढीसाठी व जिल्ह्यात पक्ष कसा वाढेल पक्षाच तळागाळापर्यंत पक्ष वाढीसाठी काम केली पाहिजे रिपब्लिकन हा बाबासाहेबांच्या विचारांचा पक्ष आहे व त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपक भाऊ निकाळजे आहेत रिपब्लिकन पक्षाला आता खंबीर नेतृत्व भेटलेला आहे या खंबीर नेतृत्वाचे हात बळकट करण्यासाठी आपण जिल्ह्यात व तालुक्यात समाजाला न्याय देण्यासाठी आपण रस्त्यावरून समाजाचे काम केले पाहिजेत आष्टी तालुक्यात व बीड जिल्ह्यात पक्ष बांधणी मजबूत करून येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक आपण स्वबळावर लढवणार असून कार्यकर्त्यांना संधी देणार असून असे त्यांनी सांगितले. भाऊच्या वाढदिवसानिमित्त गाव तिथे शाखा असा जिल्ह्यात उपक्रम राबवावा असे त्यांनी सांगितले येणाऱ्या काळात रिपब्लिकच्या पक्षाच्या माध्यमातून प्रत्येक तळागाळातल्या कार्यकर्त्याला नक्कीच न्याय मिळेल असे त्यांनी सांगितले तसेच बीड जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वाघमारे यांनी समाजाच्या सर्व प्रश्नावर हात घालून पक्षाच्या माध्यमातून समाजाला कशाला न्याय मिळवून देता येईल असे त्यांनी सांगितले दीपक भाऊ त्याचबरोबर करण्यासाठी आपण सर्व एकत्र येऊन हा बीड जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी जीवाचं रान करून पक्ष वाढण्यासाठी मी काम करेल बीड जिल्ह्यातला कुठल्या तालुक्यातला कार्यकर्ता बीडमध्ये आला त्याला कुठलेही शासकीय अडचण येऊ देणार नाही त्यांच्या प्रश्नावर शासकीय यंत्रणेस सोबत मी भांडण व समाजाला न्याय मिळवून देईल लवकरच पक्षाची बांधणी करून करून बीड जिल्ह्याची कार्यकारणी जाहीर करीन तसेच आष्टी तालुक्याच्या वतीने कैलास भाऊ जोगदंड व बाळासाहेब वाघमारे बीड जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा वंजारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आष्टी शहराध्यक्ष विनोद निकाळजे आष्टी तालुका उपाध्यक्ष हनुमान बनसोडे आष्टी तालुका सचिव सागर ससाणे सचिव शत्रुघन दादर कार्याध्यक्ष दीपक जोगदंड संघटक मारुती पंडागळे कैलास सावंत जालिंदर घाडगे विनोद जोगदंड जिगर ससाने कुलदीप काळे बंडू ससाने,पाटोदा तालुका अध्यक्ष सुखदेव उबाळे ग्रामपंचायत सदस्य सावंत फुले अक्षय बोखारे सुमित इंगळे पिंपरी चिंचवड शहर सचिव सुनील लांगे राम कदम अशोक लोंढे निखिल ससाने पंडित सावंत आदी कार्यकर्ते उपस्थित होते
★शालेय विद्यार्थ्यांना वही व पेन वाटप
रिपबलिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) चे राष्ट्रीय अध्यक्ष मा.दीपक भाऊ निकाळजे यांच्या वाढदिवसानिमित्त रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया ए महाराष्ट्र प्रदेश संघटक कैलासभाऊ जोगदंड यांनी आष्टी तालुक्यात शालेय विद्यार्थ्यांना वही व पेन वाटप केले यावेळी तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते..


