पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान स्वनिधी योजनेचा शुभारंभ
आष्टी | प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आ.सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी, आ. सुरेश धस मित्र मंडळ तथा नगरपंचायत कार्यालय आष्टी यांच्या संयुक्त विद्यमाने पंतप्रधान स्वनिधी योजनेचा शुभारंभ करण्यात आला असून नागरिक, व्यापारी, विविध व्यावसायिक यांचा उदंड प्रतिसाद पाहायला मिळाला असून एकूण ३२७ अर्ज प्राप्त झाले आहेत अशी माहिती नगरपंचायत नगराध्यक्ष जिया बेग यांनी दिली.
आ.सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली
भारतीय जनता पार्टी,आ.सुरेश धस मित्र मंडळ तथा नगरपंचायत कार्यालय आष्टी यांच्या संयुक्त विद्यमाने “पंतप्रधान स्वनिधी योजना भव्य शुभारंभ व ‘शासकीय कार्यालयात वृक्षारोपण करून भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला.
पंतप्रधान स्वनिधी योजनेतून अल्प व्याजदरात व कमी कागदपत्रांत कर्जसुविधा उपलब्ध करून या योजनेसाठी फळ विक्रेते, भाजी विक्रेते, चहा व्यवसाय, पानटपरी, बूट-चपला दुरुस्ती, फिटर, पंक्चर दुकान, घरगुती किराणा, स्टेशनरी दुकान, महिला उद्योग, टेलरिंग, पिको फॉल, बांगडी व्यवसाय, ब्युटीपार्लर, सौंदर्य प्रसाधन, पापड व्यवसाय, गिरणी – कांडप, घरगुती कापड व्यवसाय यासारखे इतर किरकोळ व्यावसायिकांनी यामध्ये व्यवसाय नोंदणीपत्र,आधार कार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट आकाराचे फोटो-५ इत्यादी कागदपत्राची पूर्तता करून अर्ज केले आहेत.यावेळी नगराध्यक्ष जिया बेग, माजी नगराध्यक्षा रंगनाथ धोंडे, गटनेते किशोर झरेकर,उपनगराध्यक्ष शैलेश सहस्रबुद्धे, सभापती शरीफ शेख,सभापती सुरेश वारुगुंळे,नगरसेवक सुनील रेडेकर,समीर शेख, नगरसेवक इर्शान खान,नगरसेवक अक्षय धोंडे,श्याम वाल्हेकर,नाजिम शेख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.