★आमदार धस आक्रमक विधानभवनात आम्ही काय गोटया खेळायला येतो काय ?
★विधानभवनातील मंत्र्यांच्या गैरहजरीवर धसांचा रुद्र अवतार..
आष्टी | प्रतिनिधी
विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांचा रुद्र अवतार सभागृहाने पाहिला.विधानपरिषद व विधानसभेच्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे .या विधान परिषद सभागृहांमध्ये दिनांक 25 रोजी काम सुरू असताना अनेक अधिकारी आणि मंत्री तेथे गैर हजर असताना आमदार धस हे बोलताना सुरुवातीपासून आक्रमक होते. आणि अधिकारी मंत्री जर सभागृहात वेळेवर येत नसतील तर आम्ही काय गोट्याखेळायला येतो का..? असा संतप्त सवाल आमदार धस यांनी सभागृहात सभापतींना विचारला या वेळी अनेक आमदारांनी त्याला समर्थन केले.सभापती महोदय मंत्री अधिकारी येत नसल्याने यावर सभापतीनी सांगून वेळ मारून नेली. गेल्या आठ दिवसापासून राज्याचे मुंबई येथे पावसाळी अधिवेशन सुरू आहे अधिवेशनात मराठवाड्यातील विविध प्रश्नांना आमदार धस मोठ्या पोटतिडकीने मांडत आहेत .ते जरी सत्तेत असून सुद्धा या भागातील प्रश्न आक्रमकपणे मांडत आहेत त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर माध्यमातून भारुड होताना दिसत येत आहे आमदार सुरेश देशांनी अधिवेशनात प्रत्येक वर्षी मंत्रिमंडळाची बैठक मराठवाड्याच्या प्रश्नासाठी कॅबिनेट बैठक छत्रपती संभाजीनगर येथे महिन्यातून एकदा तरी घ्यावी असा मुद्दा लावून धरला आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर शेतकरी आत्महत्या चे सूत्र सुरू आहे या उपायोजनावर सरकारने केल्या पाहिजे ते उपाययोजना करावी अशी आग्रही मागणी आमदार धस यांनी केली आहे. मंगळवारी 25 रोजी विधिमंडळ कामकाजात विधानपरिषदेच्या सकाळच्या सत्रात सुरुवातीपासूनच आमदार धस जोरदार बॅटिंग करत सभागृहाची लक्षणे आमदार धस यांचे सभागृहात बोलतानाचे पुढे वेगवेगळ्या मुद्द्याचे व्हिडिओ तुफान फायनल होत आहेत त्यामुळे त्यांची चर्चाही जोरदार होत आहे जनतेसाठी काय पण अशी आक्रमक भूमिका असलेले आमदार सुरेश धस यांची महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळीचं छबी आहे.