19.7 C
New York
Tuesday, September 2, 2025

Buy now

spot_img
spot_img

जनतेच्या उत्तम आरोग्यासाठी विधानसभेत आ.बाळासाहेब आजबेंनी सर्वांचेच लक्ष वेधले!

★आष्टी येथे उपजिल्हा रुग्णालयास त्वरित मंजुरी मिळण्यासाठी आ. आजबेंची मागणी

 

★मतदारसंघातील सरकारी दवाखान्याच्या इमारतींना मंजुरी व निधी उपलब्ध करून देण्याची आ.बाळासाहेब आजबे यांची विधानसभेत मागणी

आष्टी | सचिन पवार

आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील आरोग्याच्या प्रश्नाबाबत आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी मंगळवार दिनांक 25 जुलै रोजी विधानसभेत अनेक प्रश्न उपस्थित करत प्राथमिक आरोग्य केंद्र व आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारती बाबत सरकारचे लक्ष वेधले गेल्या तीन वर्षापासून प्रलंबित असलेला उपजिल्हा रूग्णालयाचा प्रस्तावाचे गांभिर्य लक्षात घेऊन शासनाने आष्टी येथे त्वरित उपजिल्हा रुग्णालय यास मंजुरी द्यावी अशी मागणी आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी आज विधानसभेत केली.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्याच्या संदर्भात बोलताना आमदार बाळासाहेब आजबे म्हणाले की आष्टीचे ग्रामीण रूग्णालय मुख्य असून,येथे येणा-या रूग्णांची संख्या जास्त आहे.गंभीर रूग्णांना जर पुढील उपचारासाठी पाठवयाचे असेल तर अहमनगरला जाण्यासाठी 60 कि.मी.व बीड ला जाण्यासाठी 100 कि.मी.चे अंतर पार करावे लागते.त्यामुळे उपजिल्हा रूग्णालयासाठी दाखल केलेल्या प्रस्तावावरील स्थगीती उठवून हा प्रश्न मार्गी लावावा ,आष्टी मतदारसंघातील गेल्या तीन वर्षापुर्वी आष्टी येथील ग्रामीण रूग्णालयाच्या ऐवजी उपजिल्हा रूग्णालय करण्यात यावा असा प्रस्ताव दाखल केला.परंतु त्यावर स्थगिती देण्यात आली आहे.या रूग्णालयात जर गंभीर रूग्ण दाखल झाला तर त्याला पुढील उपचारासाठी नगर किंवा बीड ला पाठवावे लागते.या दोन्ही ठिकाणी जाण्यासाठी दिड-दोन तासाचा अवधी लागतो. अनेक वेळा रुग्ण दगावतातही त्यामुळे येथील परिस्थितीचा आढावा घेऊन या रूग्णालयास उपजिल्हा रूग्णालय करण्यास परावानगी द्यावी.तसेच सार्वजनिक आरोग्य विभागा अंतर्गत सुलेमानदेवळा,बीडसांगवी,दौलावडगांव असे तीन प्राथामिक आरोग्य केंद्र मंजूर असून त्यांचेही कामे अजून सुरू झाले नाहीत.तसेच पाटोदा तालुक्यातील वाहली येथील आरोग्य केंद्राची इमारतीची दुरावस्था झाली असल्याने नविन इमारत होणे गरजेचे गरजेचे आहे शिरूर तालुक्यातील ब्रम्हनाथ एरम व गोमळवाडा येथे उपकेंद्र होणे गरजेचे आहे त्याचे शासनाने मंजुरी देऊन या ठिकाणच्या जनतेची होणारी अडचण दूर करावी तसेच आरोग्य विभागातील 60 टक्के कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त असून त्यामुळे रुग्णावर उपचार करण्यास अनेक वेळा अडचणी निर्माण होतात त्यामुळे शासनाने या सर्व बाबींचा गांभीर्यपूर्वक विचार करून माझ्या मतदारसंघातील आरोग्य विभागाच्या अडचणी दूर कराव्यात अशी मागणी आमदार बाळासाहेब आजबे यांनी विधानसभेत बोलताना केली.

ग्रामपंचायतला विचारात न घेता अंदाज पञक

 

सध्या जलजिवन अंतर्गत पाणीपुरवठ्याची कामे सुरू असून,मतदार संघातील ब-याच ग्रामपंचायतला विचारत न घेता अंदाजपञक दाखल केले आहेत.तसेच या जलजीवन मधून बरेच गावे वंचीत राहणार आहेत.कारण नसतानाही लांबून पाईपलाईन फिरवली गेली आहे चुकीच्या अंदाजपत्रकामुळे अनेक वाड्या वस्त्या पाण्यापासून वंचित राहणार आहेत हे सर्व अंदाजपत्रक गुत्तेदार पोचण्यासाठी तयार केले असल्याचे आढळून येते या सर्व बाबीची संबंधित विभागाने चौकशी करण्याची मागणी यावेळी आमदार बाळासाहेब आजबे यांनी विधानसभेत केली.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!