★पाटोद्यात ना.अजित पवार व ना. धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त बाळा बांगर यांच्या प्रयत्नातून शालेय विद्यार्थींना 120 सायकलचे वाटप
★पाटोदा तालुक्यामध्ये सामाजिक राजकीय चळवळ उभा करणार बांगर कुटुंबीय एकमेव!
★बाळा बांगर यांच्या पाठीशी खंबीरपणे राष्ट्रवादी युवक काँग्रेस उभे राहील प्रदेशाध्यक्ष – सुरज चव्हाण
पाटोदा | सचिन पवार
महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस फाटा-फुटीनंतर ना.अजित दादा पवार नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेस राज्यात जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष होण्याचा एक नंबरचा मान विजयसिंह बाळा बांगर यांना मिळालेला असून सतत राज्यात बीड जिल्हा एक नंबरचा कसा राहील असेच आदर्श व सामाजिक कार्यातून काम करून समाजातील शोषित पीडित वंचितांसाठी काम करावे असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी पाटोदा येथे केले.
ना.अजित दादा पवार व ना. धनंजय मुंडे यांचे वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांनां सायकल वाटप कार्यक्रमात बोलताना सांगितले.की, राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजित दादा व राज्याचे कृषी मंत्री ना. धनंजय मुंडे यांचे वाढदिवसानिमित्त पाटोदा येथे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने तालुक्यातील विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा रॉ.का. उपाध्यक्ष दीपक दादा घुमरे हे होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण आपल्या भाषणात म्हणाले की, रामकृष्ण बांगर यांचे कार्य सहकाराबरोबरच शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय आहे. विचाराचा वारसा जिवंत ठेवून तालुक्यातील मुलींना शिक्षणाची सुविधा मिळवून देण्याबरोबरच मुलींना शाळेत वेळेत त जाता यावे व शाळेतून घरी वेळेतच परत येण्यासाठी वेळेचा बचती बरोबरच मुला मुलींना आधार देण्याचे काम कौतुस्पद असून विजयसिंह बांगर यांचे अभिनंदन करून राज्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे एक बुथ दहा युवक हा राज्य पातळीवरील कार्यक्रम यशस्वी करण्याबरोबरच पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सदस्य मोहीम करावी, यावेळी सहकार महर्षी रामकृष्ण बांगर यांनी आपण आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्य बरोबरच तालुक्यातील शैक्षणिक संस्थाची उभारणी करून हजारो मुलींना शिक्षणाची सोय उपलब्ध करून देऊन त्यांच्या जीवनात यश मिळवून देण्याबरोबरच तालुक्यातील हजारो विद्यार्थी डॉ. इंजिनिअर बरोबरच उच्च अधिकारी कर्मचारी करण्याबरोबरच तालुक्यातील शेकडो बेरोजगारी ना कायम नोकरी देण्याची सोय निर्माण करून दिली. याच बरोबरच आपण इतरही संस्था उभ्या करून सामान्य शेतकऱ्याला रोजगार मिळवून देण्याचे काम करून, ऊसतोड मजुराची ओळख बदलण्याचे काम केले. असून भविष्यात ही तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी व सामान्य माणसासाठीच काम करीत राहू असे आश्वासन दिले.यावेळी दीपक दादा घुमरे यांचे भाषण झाले .तसेच प्रस्ताविकात विजयसिंह बाळा बांगर म्हणाले की, आमचे कुटुंब ९०% समाजकारण दहा टक्के राजकारण करीत आहे .कोरोना सारख्या परिस्थितीत मला काम करण्यासाठी आई-वडिलांबरोबरच आखे कुटुंब माझ्या पाठीशी उभे राहिल्यानेच तालुक्यातील सर्वसामान्य प्रेमामुळेच मी अखंडपणे यशस्वी काम करू शकलो. यापुढेच्या काळातही समाजासाठीच काम करणार आहे. आज 120 सायकल विद्यार्थिनींना वाटप करण्यात येत असून उर्वरित विद्यार्थ्यांनां ही सायकल वाटप केल्या जातील असे यावेळी सांगितले.
यावेळी या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, सहकार महर्षी रामकृष्ण बांगर ,श्रीहरी पवार ,भगवानराव बांगर, गुलाबराव घुमरे, दादाराव घुमरे ,गोवर्धन सानप, आसाराम जाधव, कॉम्रेड महादेव नागरगोजे, सरपंच प्रभाकर कवठेकर, आनंद घुमरे, विठ्ठल नाना तांबे, नामदेव सानप, नारायण नागरगोजे, रुपेश बेद्रे, बाप्पासाहेब जाधव, सचिन माने, संतोष बेदरे ,किशोर जेधे, भाऊसाहेब भराटे, बापूराव कोठुळे ,मधुकर येवले, नगरसेविका राजश्री जाधव ,अंगद भोंडवे ,केशव भोंडवे, शिवाजी नेमाने, रामदास गरजे, अनिल दगडखैर, सुरेश राख, बाबासाहेब बांगर, चिमाकांत नागरगोजे, अशोक बांगर, राजाभाऊ भोसले, हनुमान भोसले ,राजेंद्र सकुंडे, संजय सानप, संजय पवार ,विनोद गायकवाड, केशव भोंडवे, नारायण गाडे ,हरिदास गर्जे ,भगवान पाखरे ,श्रीकांत कुडके ,शेषराव कदम, भीमराव मिसाळ ,महादेव भोसले, साहेबराव बेंद्रे ,अभिजीत मुंडे, देविदास गरजे सह तालुक्यातील विविध गावचे सरपंच सेवा सोसायटीचे चेअरमन ग्रामपंचायत सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते व सायकल वाटप मधील विद्यार्थिनी ,पालक विद्यार्थी सह सर्व मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्व उपस्थिताचे स्वागत बीड जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विजयसिंह बाळा बांगर यांनी केले. व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सय्यद सज्जाद यांनी केले तर सायकल वितरण प्रा.संजय सानप यांनी केले तर आभार प्राचार्य तुकाराम तुपे सर यांनी व्यक्त केले.
★एक नंबरचा मान विजयसिंह बाळा बांगर यांना मिळालेला
उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी सत्तेत कोणाचा निर्णय घेतल्यानंतर आणि वेगळा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पहिला जिल्हाध्यक्ष होण्याचा मान विजयसिंह बाळा यांना मिळाला असून सतत राज्यात बीड जिल्हा एक नंबर कसा राहील यासाठी आदर्श आणि सामाजिक कार्यातून काम करून सर्वांनाच न्याय देण्याचे काम करावे असे आव्हान राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी केले आहे.
★ बांगर कुटुंबीयांचे शिक्षणाबरोबर वंचितांना आधार देण्याचे काम कौतुकास्पद!
बीड जिल्ह्यामध्ये शिक्षणाची गंगा पोहोच करणारे बांगर कुटुंबीय आहे. राजकारण शिक्षण क्षेत्र सामाजिक क्षेत्र शेतीविषयक क्षेत्रामध्ये देखील उल्लेखनीय कार्य करणारे बांगर कुटुंबीय एकमेवच आहे. राजकारणात महत्वाची भूमिका आता बांगर कुटुंबीयांची झाली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात त्यांच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आहे, आशावाद राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांकडून व्यक्त केला गेला आहे.
★ आमच्या कुटुंबाचे 90% समाजकारण आणि 10% राजकारण
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजयसिंह बांगर यांनी प्रास्ताविक व्यक्त करताना आमच्या कुटुंबियाचे 90% समाजकारण आणि दहा टक्के राजकारण आहे कोरोना सारख्या महामारी मला काम करण्यासाठी आई-वडिलांबरोबरच अख्या कुटुंब आणि साथ दिली आणि माझ्या पाठीशी खंबीर उभे राहिले तालुक्यातील व सामान्यांच्या प्रेमामुळेच मी अखंडपणे यशस्वी काम करू शकलो यापुढे देखील काम करत राहील अशा भावना व्यक्त केल्या..