★शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषणाचा इशारा
धारूर | प्रतिनिधी
धारूर तहसील कार्यालयातील पदावर कार्यरत असलेले अवल कारकुन असलेले नजीर कुरेशी यांची बदली झालेली असतानाही ते धारूर तहसील येथे मंडळ अधिकारी या पदावर कार्यरत असून त्यांनी इनामी जमिनीमधील वर्ग दोन खिदमतमास मधून वर्ग एक मध्ये केलेल्या बेकायदेशीर फेरफार मंजूर प्रकरणाची चौकशी करून त्यांचे धारूर येथून तात्काळ बदली करण्यात यावी असे निवेदन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख बाबासाहेब सराफ यांनी जिल्हा अधिकारी यांना देण्यात आले आहे.
नजीर कुरेशी हे मागील अंदाजे सहा वर्षापासून पदाचे अव्वल कारकून असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांची व शासनाची दिशाभूल करून मंडळ अधिकारी या पदावर बेकायदेशीर रित्या कामे करत असून तसेच त्यांनी इनामी जमिनीमध्ये आर्थिक स्वरूपाची देवाणघेवाण करून देवस्थान व मस्जितीच्या जमिनी खिदमतमास असताना सुद्धा वर्ग २ मधून वर्ग १ करून देवस्थानची व मस्जितीची नावे कमी करून वैयक्तिक व्यक्तींची नावे लावण्यात आले आहेत. पदाचे अव्वल कारकून असणारे परंतु सध्या किल्ले धारूर येथे मंडळ अधिकारी या पदावर बेकायदेशीर रित्या कार्यरत असणारे नजीर कुरेशी यांनी बेकायदेशीर फेरफार नोंद करण्याचा सपाटा लावला आहे असे निवेदनात म्हंटले आहे.
इनामी जमिनीची प्रलंबित असलेले फेरफार मंजूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण करून बेकायदेशीर फेर मंजूर करण्याच्या तयारीत आहेत.एका प्रकरणात सध्या मंडळ अधिकारी यांच्याकडे सुनावणीचे प्रकरण सुरू आहे परंतु सदर प्रकरणांमध्ये याच मंडळ अधिकाऱ्याने मागील काळामध्ये वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये देवस्थानचे नाव कमी करून खाजगी व्यक्तीच्या नावे देवस्थानची जमीन केलेली आहे.प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करून सदरील जमिनीचा वर्ग बदललेला आहे.अशी माहिती मिळत आहे. कोणताही निर्णय संबंधित मंडळाधिकारी नजीर कुरेशी यांच्याकडून देण्यात येऊ नये, त्यांनी आतापर्यंत देवस्थानच्या व मज्जिद च्या जमिनी बाबतीत घेतलेले फेरफार रद्द करून त्यांच्या गैरकारभाराची चौकशी करण्यात यावी,त्यांची धारूर येथून तत्काळ बदली करण्यात यावी असे निवेदन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहर प्रमुख बाबासाहेब सराफ यांनी जिल्हाधिकारी यांना दि.14 रोजी निवेदन दिले आहे. दि.१/०८/२०२३ पर्यंत कार्यवाही करावी अन्यथा शिवसेनेच्या वतीने दि.०२/०८/२०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा शिवसेना शहरप्रमुख बाबासाहेब सराफ यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.