★मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा – राहुल जाधव
पाटोदा | प्रतिनिधी
मणिपुर राज्यात मागील तीन महिन्यापासुन हिंसाचार सुरू आहे. खुलेआम महिलांची नग्न अवस्थेत धिंड काढून बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी तसेच या घटनेत जबाबदार धरून मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा असे निवेदनात नमूद तालुकाध्यक्ष राहुल जाधव यांच्या नेतृत्व खाली दिलेल्या निवेदनात केले आहे.या निवेदनात जबाबदार असणाऱ्या मणीपूर राज्य सरकारच्या निषेधार्थ पाटोद्यात राष्ट्रीय काँग्रेस,पक्षाच्या वतीने केलेल्या निषेध निवेदनात राष्ट्रीय काँग्रेस पक्षासह सर्व पक्षीय नेते, कार्यकर्त्यांनी सहभाग घेऊन निषेध व्यक्त केला.
महिलांची नग्न धिंड काढून त्यांच्यावर सामुहिक आत्याचार केल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमावर प्रसारीत झाल्याने देशातील जनतेत प्रचंड संताप निर्माण झाला आहे. या निंदनीय घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने सोमवार दिनांक २४ रोजी पाटोदा तहसीलदार मा.चितळे साहेब यांना निवेदन देऊन मागणी केली आहे. याप्रसंगी या घटना कृत्य करणाऱ्या व्यक्तींचा निषेध करण्यात आला व त्याना कडक शासन करण्यात यावे.निवेदनात मणिपूर येथील घटनेत जबाबदार असणाऱ्या राज्य सरकारचा धिक्कार असो, मणिपूर वाचवा, सविधान वाचवा, लोकशाही टिकवा अशा प्रकारच्या घोषणा देऊन मणिपूर सरकारचा जाहीर निषेध केला.याप्रसंगी उपस्थित विविध पक्षांच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी या घटनेच्या निषेधार्थ आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी दिलेल्या निवेदनावर राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राहुल जाधव, नगरसेवक उमर चाऊस, शहराध्यक्ष शेख इम्राननुर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष शिवभूषण जाधव ,अॕड.सय्यद वहाब, ,काॕ.महादेव नागरगोजे, उध्दव ठाकरे सेना तालुकाध्यक्ष मुकुंद शिंदे, गणेश कवडे, अबलूग घुगे,शेख मुबीन, सय्यद रियाज, रियाज सिद्दीकी,पवन अडागळे,फैसल चाऊस,पठाण मुक्रम,शंकर घाडगे, दादाराव जावळे,अजय डोरले, संकेत अडागळे,दिलीप वाघमारे, गंगाराम तांबे, किशोर घुमरे,शेख साजेद, राजेंद्र जायभायसह आदींच्या निवेदनावर सह्या आहेत