★शंखी गोगलगायबाधीत पीक क्षेत्राची केली पाहणी
सौताडा : प्रदिप उबाळे
यंदाचा मान्सून राज्यात उशिरा दाखल झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उशिरा पेरण्या केल्या, पाटोदा तालुक्यातही पाऊसाने जुलै च्या पहिल्या आठवड्यात दर्शन दिल्यामुळे अस्मानी संकटातुन शेतकरी कसाबसा सावरला …काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट उभे राहिले परंतु मध्यंतरी झालेल्या पावसामुळे पीके बहरली व शेतकरी राजा अस्मानी संकटातुन बचावला . सोयाबीन तुर मुग उडीद या पिकांना नवसंजीवनी मिळाली.तोच बळीराजा पुढं अस्मानी संकट उभे राहिले आहे… अंमळनेर सह आठ्ठेगावपुठ्यातील सौताडा, घुलेवाडी, भुरेवाडी कुसळंब ,सुपा ,सावरगाव गंडाळवाडी लांबरवाडी, मुगगाव,गंडाळवाडी निवडुंगा, अंतापुर ,चिखली, चिंचोली वहाली या महसूल मंडळातील सर्व शेतकऱ्यांच्या शेतामधील सोयाबीन,तुर ,मुग, उडीद या सर्व पिकांना शंखी गोगलगायने विळखा घातला आहे, त्यामुळे उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे..या उभ्या पिकांची पाहणी तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्यात यावी यासाठी पाटोदा पंचायत समितीचे माजी सभापती गोवर्धन सानप हे आज ,राज्याचे कृषिमंत्री ना धनंजय मुंडे, पाटोदा तहसीलदार यांना लेखी निवेदन देणार असल्याचे सभापती गोवर्धन सानप यांनी दिव्य लोकप्रभा प्रतिनिधीशी बोलताना सांगितले..