चिचाळा येथील गोमाता सेंद्रिय शेती गटाला कृषी आयुक्तांची भेट
आष्टी | प्रेम पवळ
तालुक्यातील चिंचाळा गावांत कृषि आयुक्त सुनिल चव्हाण व तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे, कृषी सेवक खरात यांनी भेट दिली असता त्यावेळी गोमाता सेंद्रीय शेतीगटाचे अध्यक्ष डॉ जानदेव साळुंके, उपाध्यक्ष गणेश पोकळे, सचिव धर्मराज पोकळे, सरपंच पंडित पोकळे व सर्व सदस्य,शेतकरी तसेच पाणी फाऊंडेशन संचलित फ्रामर कप स्पर्धेतील बाबाजी विश्वेश्वर शेतकरी गट यांना सेंद्रिय शेती विषय माहिती माहिती देऊन कृषी आयुक्त सुनिल चव्हाण यांनी सांगितले की गोमाता सेंद्रिय शेती गटांचे काम उत्कृष्ट पणे चालू असून त्यांना शासनाच्या वतीने गट शेतीसाठी सर्वतोपरी मदत केली जाईल असे आश्वासन दिले.