★अंभोरा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी ; आरोपी मात्र पसार !
आष्टी | प्रेम पवळ
बीड नगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेले आष्टी तालुक्यातील तेथे गावठी हातभट्टी दारूचा अड्डा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच या माहितीवरुन अंभोरा पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून छापा टाकला असता अंदाजे 1800 ते 1900 लिटर गावठी दारु बनवण्याचे विषारी रसायने व साहित्य नष्ट केले.ही कारवाई शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
आष्टी तालुक्यातील साकत येथील नदीपात्राजवळ वेड्या बाभळीच्या झुडपामध्ये असणाऱ्या अडचणीत हा सारा प्रकार अनेक दिवसांपासून गावठी दारु बनवून विक्री केली जात होती.ही गोपनीय माहिती अंभोरा पोलिसांना मिळताच ठाणेदार महादेव ढाकणे यांनी पथकासह शनिवारी दुपारी छापा टाकला.
दरम्यान पोलिसांना या साऱ्या घटण्याना सुगावा लागला हे आरोपींना समजतात त्यांनी त्या ठिकाणाहून पळ काढला..,
पोलिसांनी कारवाईदरम्यान 1 लाख 2 हजारांचे गावठी दारुचे रसायन आणि दारु बनवण्याचे साहित्य पुर्णपणे नष्ट केले आहे.साकत येथील ही कारवाई उपनिरीक्षक अभिजित धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आदिनाथ भडके, पोलिस हवालदार सत्यवान गर्जे,पवार, पोलिस अंमलदार शिवदास केदार, बाळासाहेब जगदाळे हे सर्व पोलिस कर्मचारी या पथकामध्ये कार्यरत होते.