शिरूर कासार मराठी पञकार परिषदेची बैठक उत्साहात संपन्न
शिरूर कासार | जिवन कदम
शिरूर कासार मराठी पञकार परिषदेच्या वतिने शहरातील ज्ञानाई शास्ञीय संगीत विद्यालयात परिषदेच्या महत्वाच्या विषयावर बैठक रविवार ता.२३ रोजी आयोजित करण्यात आली होती. या वेळेस नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा तालुका पञकार परिषदेच्या वतिने सत्कार करण्यात आला.या वेळेस मोठ्या प्रमाणावर परिषदेचे सदस्य उपस्थित होते.
या बैठकीच्या आध्यक्ष स्थानी मराठी पत्रकार परिषदेचे जिल्ह उपाध्यक्ष पञकार चंद्रकांत राजहंस हे होते तर जेष्ठ पञकार बबनराव देशमुख, विजयकुमार गाडेकर पाटील, अशोकराव भांडेकर यांनी उपस्थित सदस्यांना मार्गदर्शन केले.
या वेळेस मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस.एम.देशमुख सर, जिल्ह आध्यक्ष विशाल सोंळुके सर, विभागीय संघटक सुभाष चौरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेच्या ध्येय धोरणानुसार विकासात्मक वाटचाल राहुन परिषदेची स्थानिक पातळीवर सर्वांना बरोबर घेऊन संघटनात्मक बांधणी ला बळ देऊन प्रत्येक मासिक बैठक घेऊन विचारविनिमय घेऊन ठोस निर्णय घेण्यात येतील आसी बैठकीत सकारात्मक ठराव घेण्यात आला.या वेळेस नवनियुक्त तालुका अध्यक्ष जालिंदर नन्नवरे, डिजिटल मिडिया तालुका अध्यक्ष ज्ञानदेव शिंगटे यांची निवड झाल्या बदल परिषदेच्या वतिने सत्कार करण्यात आला.या वेळेस मराठी पत्रकार परिषदेचे जेष्ठ मार्गदर्शक बबनराव देशमुख, विजयकुमार गाडेकर पाटील, परिषदेचे तालुका आध्यक्ष जालिंदर ननवरे,डिजिटल मिडीयाचे तालुका अध्यक्ष ज्ञानदेव शिंगटे,परिषदेचे तालुका कार्याध्यक्ष अशोक भांडेकर,सरचिटणीस गोरख खेडकर,जिवन कदम, अशोक कानगांवकर, शंकर भालेकर, गोकुळ भुसारे, शाहाबाज पठाण, प्रकाश टकले हे उपस्थित होते.