12.3 C
New York
Tuesday, April 1, 2025

Buy now

spot_img
spot_img

कृषी उत्पन्न बाजार समिती सभासदांना अपघाती विमा संरक्षण देणार

★धामणगाव आणि दौलावडगाव येथे उपबाजार पेठ निर्माण करणार – आ.सुरेश धस

आष्टी | प्रतिनिधी

कडा कृषी उत्पन्न बाजार समिती या संस्थेद्वारे तालुक्यातील सर्व सेवा सोसायटीचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक आणि सभासद तसेच सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्य तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यापारी संचालक आणि सभासद तसेच हमाल मापाडी संचालक आणि सभासद या सर्वांना कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे अपघाती विमा संरक्षण दिले जाणार असून अपघातातील मयताचे कुटुंबीयांना नुकसान भरपाई बरोबर अपघातातील जखमींना दवाखान्यातील उपचारासाठी 2.00 लक्ष रू. पर्यंतचा विमा संरक्षण देण्यात येणार आहे असे प्रतिपादन आ. सुरेश धस यांनी केले..
कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणुकीनंतर नवनिर्वाचित संचालक मंडळाचे वतीने सर्व सभासदांचा भव्य मेळावा व स्नेह भोजन आयोजित करण्यात आले होते त्यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना ते बोलत होते..यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विष्णुपंत चव्हाण,युवा नेते जयदत्त धस,सभापती बद्रीनाथ जगताप,सभापती रमजान तांबोळी,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजय आजबे,शत्रुघ्न मरकड,आदिनाथ सानप,दत्तात्रय जेवे,अशोक गर्जे,राजेंद्र दहातोंडे,संदीप खकाळ,संजय ढोबळे,संपत सांगळे,परिवंत गायकवाड आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले,कडा कृषी उत्पन्न बाजार समितीची अविरोध निवडणूक झालेली मराठवाड्यातील ही एकमेव संस्था असून ही संस्था ताब्यात आल्यापासून आपण प्रामाणिकपणे या संस्थेद्वारे शेतकऱ्यांना न्याय देण्याचा काम केलेले आहे. आष्टी येथील जागेसाठी मूळ मालकांना मोबदला म्हणून 3.50 कोटी रु. दिले असून हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यात आला आहे सध्या संस्थेकडे 1.40 कोटी रु. ठेव असून करंट अकाऊंटमध्ये 30.00 लक्ष रु.शिल्लक आहेत ..या बाजार समितीचा पारदर्शी कारभार असल्यामुळे शेतकऱ्यांचा शेतमाल घेऊन येणाऱ्या चालक यांना कमिशन दिले जात नाही.. या ठिकाणी लहान,आणि मोठा असा शेतकऱ्यांमध्ये भेदभाव केला जात नाहीत तूर खरेदी वेळी शेतकऱ्यांनी रांगा लावून तूर विक्री केली मार्केटच्या संचालकाला सुद्धा याच रांगेत उभे केले गेले होते..
खासगी खरेदी केंद्राऐवजी शेतकरी अत्यंत विश्वासाने कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मालाची विक्री करतात कारण या संचालक मंडळावर शेतकऱ्यांचा अतोनात विश्वास बसलेला आहे आणि हाच विश्वास टिकवण्याचा आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहोत या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान म्हणून 21 कोटी 56 लाख रु.अनुदान मिळणार असून यापूर्वी सन 2016 मध्ये 1.49 कोटी रू. 2018 मध्ये 7 कोटी 53 लक्ष एवढे अनुदान केवळ भारतीय जनता पार्टी-शिवसेनेच्या शासन कालावधीमध्ये वाटप करण्यात आले आहे. मध्यंतरीच्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी काहीही करण्यात आलेले नाही मागील काळातील गारपीटीचे नुकसान भरपाई चे अनुदान देखील काही दिवसात मिळणार आहे.. भारतीय जनता पार्टीच्या काळातच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई किंवा इतर सुविधा मिळाल्या आहेत पूर्वी अनुदान मंजूर होऊन शेतकऱ्यांना मिळेपर्यंत उशीर व्हायचा परंतु आता या शासनाच्या काळात थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अनुदान जमा होत आहे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रु. देण्याचे शासनाचे धोरण आहे परंतु अद्यापही अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालेला नाही या अधिवेशनामध्ये सहकार विभागाच्या चर्चेमध्ये हा विषय आपण पटलावर घेणार आहोत असे सांगून ते म्हणाले की,महाविकास आघाडीच्या काळात केवळ घोषणा झाल्या परंतु पुन्हा आलेल्या शिंदे आणि फडणवीस यांच्या सरकार मध्येच शेतकऱ्यांच्या हिताची कामे झाली आहेत असे सांगून ते म्हणाले की,तालुक्यातील सर्व भागातील शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीचा फायदा व्हावा यासाठी नव्याने धामणगाव आणि दौलवडगाव या दोन ठिकाणी उपबाजार पेठ निर्माण करण्यात येणार आहेत तसेच कडा येथे महाराष्ट्रातील लासलगाव नंतरची कांदा बाजारपेठ म्हणून ओळख निर्माण झाली आहे त्याच पद्धतीने बाजार समितीमध्ये यापुढे लिंबू खरेदी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी पुढे सांगितले. त्याचबरोबर या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये दर्जेदार सिमेंट रस्ते करण्यासाठी देखील निधीची तरतूद करण्यात आली आहे आणि लवकरात लवकर रस्त्याची कामे होणार आहेत असे सांगून ते पुढे म्हणाले की शेतकऱ्यांचा पूरक व्यवसाय असलेला दुधाचे दर या शासनाने 34 रुपये निश्चित केला असून शासन याबाबत सकारात्मक असून दूध खरेदी करणारे मात्र दुधाचा भाव कमी होण्यासाठी प्रयत्न करत आहेत शेतकरी सन्मान योजनेमध्ये केंद्र शासनाचे 12 हजार रु.असून त्यामध्ये महाराष्ट्र शासनाचे आणखी 6 हजार रुपयांची भर पडणार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे… कार्यकर्त्यांनी गावोगाव ऊस तोडणी मजूर यांची नोंदणी करावी कारण अधिकृत मजुराच्या अपघात झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना 10 ते 15 लक्ष रु.पर्यंत मदत मिळू शकते त्यामुळे कार्यकर्त्यांनी या कामी लक्ष देण्याची आवश्यकता आहे असे सांगून ते म्हणाले की गावोगावच्या विविध क्षेत्रात मजुरी करणाऱ्या लोकांची ई- श्रम योजने मध्ये समावेश करण्यासाठी त्यांची ही नोंद करावी असे आवाहन केले..या कार्यक्रमाच्या सुरुवातीला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक हिरालाल बलदोटा, आष्टी पंचायत समितीचे माजी उपसभापती आदिनाथ सानप,आणि कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन रमजान तांबोळी यांची समायोजित भाषणे झाली..यावेळी कडा येथील सेतू सुविधा केंद्राचे संचालक अतुल कर्डिले यांनी 25 हजार शेतकऱ्यांचा विनामूल्य पिक विमा भरल्याबद्दल त्याचा विशेष सत्कार करण्यात आला तसेच आष्टी येथील नवयुवक पैलवान अतीश तोडकर यांनी ऑलिंपिक मधील रौप्य पदक विजेता असलेल्या रवी दहिया या मल्लावर विजय मिळवल्याबद्दल या बैठकीमध्ये त्याचे कौतुक करण्यात आले.यावेळी संजय मेहेर,लक्ष्मण ननवरे,काकासाहेब थेटे,अनिल ढोबळे, अशोक ढवण,शिवाजी अनारसे,सरपंच प्रतिभा थोरवे,सौ. वंदना परिवंत गायकवाड,सौ.प्रतिभा मल्हारी शिंदे, मुरलीधर फसले,श्याम तळेकर,गौतम आजबे,राहुल मुथ्था,अशोक इथापे,योगेश भंडारी, डॉ.पांडुरंग चौधरी, रामदास शेंडगे,अजित घुले,अशोक पवार, रामशेठ मधुरकर,यशवंत खंडागळे,शिवराज पाटील,मनोज गाढवे,रिजवान शेख,अशोक लगड,राजू शिंदे,सरपंच अशोक मुळे,खंडू जाधवअतुल कोठुळे,कपिल अग्रवाल,अक्षय धोंडे,गंगा पडोळे आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सिद्धेश्वर शेंडगे सर यांनी केले तर उपस्थितांचे आभार सभापती रमजान तांबोळी यांनी केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!