★कार्यकर्त्यांकडून जय्यत तयारी..तरीही आ.सुरेश धस यांनी ६०० किलोचा हार स्वीकारला नाही..
आष्टी | प्रतिनिधी
जिल्हा सरहद्द लोणी ते वृद्धेश्वर या पन्नास किलोमीटर लांबीच्या आणि दहा किलोमीटर रुंदीच्या रस्त्या कामास मंजुरी मिळाल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी आ.सुरेश धस हे मुंबई वरून प्रथमच धानोरा येथे येणार असल्याने जमलेल्या कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी करून डी.जे.आणि आणलेला 600 किलो वजनाचा फुलांचा हार आ. सुरेश धस यांनी रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे अपघाती बळी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली म्हणून हा विशाल पुष्पहार श्रद्धांजली म्हणून स्वीकारला नाही हे आजच्या स्वागत कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते.उपस्थित कार्यकर्त्यांसमवेत धानोरा येथील संतोषी माता मंदिरात संतोषी माता ला हार व नारळ चढविण्यात आला.गेली अनेक वर्षा पासून मागणी होत असलेली जिल्हा सरहद्द लोणी, धानोरा, हिवरा, मच्छिंद्रनाथ देवस्थान ते श्रीक्षेत्र वृद्धेश्वर या रस्ता कामाला अॅनयूटी योजनेतून मंजुरी मिळाली आहे अशी माहिती सुरेश धस यांनी धानोरा येथे कार्यकर्त्यांसमोर बोलताना दिली..
आ. सुरेश धस मुंबई येथून परत येत असतानाच. ६०० कोटी रुपये किमतीच्या या रस्त्याच्या मंजुरीनंतर आनंदीत झालेल्या या रस्त्याच्या लगत असलेल्या लोणी,दौलावडगाव,धानोरा जि. प.गटातील प्रमुख कार्यकर्त्यांनी ६०० किलो वजनाचा फुलांचा हार तयार करून या पुष्पाहाराद्वारे आ. सुरेश धस यांचे स्वागत करण्याची तयारी केली होती परंतु इर्षाळगडा च्या पायथ्याशी झालेल्या अपघातातील मृतांना श्रद्धांजली म्हणून आनंदोत्सव साजरा करायचा नाही असा आदेश आ. सुरेश धस यांनी दिल्यानंतर हा विशाल पुष्पहार मच्छिंद्रनाथ गडाकडे पाठवण्यात आला या रस्त्याबाबत अधिक माहिती देताना आमदार धस पुढे म्हणाले की, जिल्हा सरहद्द लोणी ते वृद्धेश्वर हा रस्ता ५० किलोमीटर लांबीचा दहा मीटर रुंदीचा भव्य असा रस्ता मंजूर करण्यात आला असून या रस्त्याच्या सर्वेक्षण आणि सविस्तर प्रकल्प अहवालासाठी ६० लक्ष रुपये मंजूर झाले असून त्यानंतर या रस्त्याची किंमत साधारणपणे सहाशे कोटी किंवा त्यापेक्षा जास्त होऊ शकते या रस्त्यामुळे लोणी धानोरा हिवरा सावरगाव ते वृद्धेश्वर हा दर्जेदार आणि मोठा रस्ता होणार असल्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना शेतमाल व्यापाऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी फार मोठी सुविधा निर्माण होणार आहे लवकरच या कामात सुरुवात होईल असेही त्यांनी शेवटी सांगितले.यावेळी वृद्धेश्वर देवस्थान, कानिफनाथ देवस्थान, मढी व मच्छिंद्रनाथ देवस्थान सावरगाव मायंबा येथील तिन्ही ठिकाणच्या विश्वस्तांनी आमच्या भागातील रस्त्याच्या कामाला प्रयत्नाने भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याने नाथाची प्रतिमा देऊन आ. सुरेश धस यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी जयदत्त धस,अंकुश चव्हाण,नगराध्यक्ष जिया बेग,अनिल ढोबळे,गणेश शिंदे,राजेंद्र दहातोंडे,राजाभाऊ शेळके,सरपंच कांतीलाल शेठ चानोदिया,रामहरी महारनोर, जयशिंग गव्हाणे,कृष्णा काकडे,मनोज थोरवे,राहुल सुरवसे, अशोक इथापे,सरपंच प्रतिभा थोरवे,रावसाहेब शिरसाठ,राजू मस्के, रामेश्वर चव्हाण, प्रशांत होळकर, सुरेश गर्जे, अशोक लगड,डॉ.पांडुरंग चौधरी,नीलकंठ राकटे, जालिंदर वाळके,रामदास शेंडगे,शरद देसाई, नवनाथ जगताप,भाऊसाहेब झांजे,भीमराव माळशिखरे,ज्ञानेश्वर खराटे,अशोक परकाळे, उद्धव विधाते आदीसह परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.